Duration 1:11

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज संध्याकाळी आचरा इथं पोहचली

798 watched
0
1
Published 28 Aug 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज संध्याकाळी आचरा इथं पोहचली. जनआशीर्वाद यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद हा लोकांच्या अपेक्षांचा असलेला प्रतिसाद आहे. कोकणवासियांनी नारायण राणे मंत्री झाल्यामुळे आता मोठ्या अपेक्षा बाळगल्या आहेत. या ठिकाणी त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योगधंदे उभारले जातील, असा आशावाद यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला . तत्पूर्वी,कोरोना काळात संकटात सापडलेल्या लोकांना मोदी सरकारनं अनेक योजनांद्वारे दिलासा दिला, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जामसांडे इथं आज राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं स्वागत झालं. त्यानंतर आयोजित सभेत राणे यांनी केंद्र सरकारच्या अनेक लोकोउपयोगी कार्यक्रमांची माहिती दिली. दरम्यान, आज सकाळी राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात कणकवली इथल्या चौकातून झाली. त्यानंतर ती नांदगाव इथं पोहोचली. लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून विशेषत: तरुणांमध्ये उद्यमशीलता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं. आपल्या मतदारसंघात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवा, अशी सूचना पंतप्रधानांनी केल्यानं आपण जनआशीर्वाद यात्रा सुरु केल्याचं राणे यांनी सांगितलं.

Category

Show more

Comments - 0